Thursday, January 20, 2022

सोनईत पद्मश्री सिंधूताईंच्या आठवणींना उजाळा  त्यांच्या प्रेरणेतून साकारले आपुलकी वसतिगृह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हजारो अनाथांच्या आई म्हणून ज्यांनी खुप मोठे विधायक कार्य केले अशा पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर सोनईत अनेकांनी दु:खं व्यक्त केले.त्यांच्या प्रेरणेतून साकरलेल्या

आपुलकी अनाथ वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.सन १९९० साली नगरच्या न्यु आर्टस महाविद्यालयात तत्कालीन प्राचार्य खासेराव शितोळे यांनी सिंधूताईंचे व्याख्यान ठेवले होते.

त्यांच्या भाषणाची प्रेरणा घेत विद्यार्थी सुधाकर गडाख यांनी सोनई- बेल्हेकरवाडी रस्त्याला सन २००० साली आपुलकी अनाथ वसतीगृह बांधले.या इमारतीचे उदघाटन सिंधूताईंच्या हस्ते झाले होते.यावेळी वसतीगृहात ४५ मुले होती.त्यांनी सर्व मुलांशी संवाद साधत यशस्वी होण्याचा गुरूमंत्र दिला होता.

आपुलकी वसतिगृहाचे सदस्य सुधाकर गडाख, विनायक दरंदले, कन्हैयालाल चंगेडिया,एस.बी.शेटे,संतोष जनवीर यांनी पुढे नेवासा,शनिशिंगणापुर,नगर,मुळा कारखाना व मुळा एज्युकेशन संस्थेच्या अनेक शाळेत सिंधूताईंचे व्याख्यान आयोजित

करत त्यांच्या संस्थेला मदतीचा हातभार लावला होता.’आपुलकी ‘मधील सन २००० मधील विद्यार्थी सुशांत देशमुख, गणेश मनाळ,आप्पासाहेब कोकरे,सागर वाडेकर,रवी पवार, शंकर पवार आता नोकरी किंवा व्यावसायात आहेत. या सर्व

युवकांनी सिंधूताईंच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आपुलकीच्या सदस्यांनी सिंधूताईंच्या अनेक वसतिगृहास यापुर्वी भेट दिलेली आहे.पिंपळनेर, अमरावती येथे गेल्यानंतर तेथील व्यवस्था व त्यांच्या कार्यातून खुप मोठी उर्जा मिळत होती.

असे सुधाकर गडाख यांनी सांगितले.ताईसाहेब कन्या विद्यालयात झालेल्या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थी,शिक्षक व उपस्थित पालकांना भावनिक भाषणाने मंत्रमुग्ध करत सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले होते. अशी आठवण सामाजिक कार्यकर्ते अशोकदेवा कुलकर्णी यांनी सांगितली.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!