Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात भयानक स्थिती, पण सरकारचे दुर्लक्ष माजी मंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम : नगर जिल्ह्यामध्ये रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार सुरू आहे, व्हेंटीलेटर न मिळाल्याने रुग्ण रस्त्यावर मृत होत आहेत व जिल्ह्यात भयाजन स्थिती आहे.

प्रशासनाच्या आवाक्याबाहेर सारे गेले आहे. पण जिल्ह्यातील तीन मंत्री व पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप भाजपचे माजी आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी येथे केला.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड संदर्भातील निवेदन प्रा. शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगरचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे आदी यावेळी उपस्थित होते.

माजी मंत्री शिंदे म्हणाले, रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही, व्हेंटीलेटर उपलब्ध नाहीत, बेड उपलब्ध नाही, सरकार व लोक प्रतिनिधी यामध्ये लक्ष घालायला तयार नाही. रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. देशातील दहा जिल्ह्यांमध्ये आपला जिल्हा आहे.

सर्व यंत्रणा हतबल झाली आहे, असा दावा करून ते म्हणाले, पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाही. उपचार मिळाले नाही म्हणून लोक रस्त्यावर मयत झाले आहेत, ही गंभीर बाब आहे. जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिलेली आहे.

त्यांनी निश्‍चितपणे यामध्ये सुधारणा होईल, असे सांगितले आहे. नागरिकांनी पण यासंदर्भामध्ये प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!