Saturday, January 22, 2022

नेवाशात ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान…. पत्रकारांमुळेच लोकशाही मजबूत- गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संसदिय लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारांमुळेच देशात लोकशाही मजबूत असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र नेवासा संत ज्ञानेश्वर मंदीराचे मठाधिपती शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.

पत्रकार दिनाच्या निमित्ताने नेवासे एकता पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गुरुवर्य देशमुख महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय गांधी होते. संघाच्या वतीने यावेळी

नेवासे तालुका पत्रकारितेत तीन-चार दशके योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ पठाडे, विजय गांधी, भाऊसाहेब पाठक, शिवाजी पालवे, तसेच ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक रंगनाथ पंडीत यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

उपस्थितांचे स्वागत नेवासे तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे यांनी केले तर प्रास्ताविक मार्गदर्शक माजी अध्यक्ष विनायक दरंदले यांनी केले. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु अशोक ढगे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त करुन उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी एकता पत्रकार संघाचे कैलास शिंदे अशोक डहाळे, सुहास पठाडे, दादासाहेब निकम, अविनाश जाधव, अनिल रोडे, प्रवीण तिरोडकर, शंकर नाबदे, राहुल कोळसे, श्याम मापारी, अशोक पंडीत,

गणेश मुळे, संतोष औताडे, प्रकाश येळवंडे, युसुफ सय्यद बाळासाहेब आरगडे, राजेंद्र लाटे, देविदास चौरे, अविनाश येळवंडे, दादा दरंदले, बाळकृष्ण पुरोहित, बन्सीभाऊ एडके, दत्तात्रेय भिंगारे, इकबाल शेख जितेंद्र पतंगे, इस्माईल शेख, कारभारी गरड, नवाब शहा,

राजेंद्र लाटे, रमेश शिंदे, शशिकांत बर्वे, सुधाकर होंडे, विकास बोरडे, अशोक तुवर, दिलीप शिंदे, गणेश दारकुंडे, आदिनाथ मस्के आदी उपस्थित होते. पत्रकार सोपान भगत यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

मंत्री गडाखांच्या शुभेच्छा.

[ पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी कार्येक्रमस्थळी भेट देऊन एकता पत्रकार संघाचे कार्येक्रमास व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.]

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!