Thursday, January 20, 2022

नगर ब्रेकिंग धक्कादायक :पती व भायाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून पती व भायाकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली.

शुभांगी शरद काकडे (वय 21 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वाळुंज पारगाव शिवारात गुरूवारी रात्री अडीच वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती शरद गोरख काकडे व भाया रवींद्र गोरख काकडे (दोघे रा. पारगाव वाळुंज) अशी

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैशाली हरिश्‍चंद्र गुलदगड (वय 39 रा. सिव्हिल हडको, गणेश चौक, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तोफखाना पोलीस

ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत शुभांगी हिचा मृतदेहाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.याबाबत वैशाली गुलदगड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुभांगी

वाळुंज पारगाव येथे सासरी नांदत असताना पती शरद व भाया रवींद्र हे दोघे तिच्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. जागा घेण्यासाठी व पती शरद याला पाच ग्रॅम सोन्याची

अंगठी करण्यासाठी माहेरहून पैसे आणावे या कारणासाठी तिचा पती व भायाकडून छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून शुभांगीने गुरूवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!