Sunday, June 4, 2023

अबकी बार किसान सरकार:शरद मरकड  नेवासा तालुक्यात भारत राष्ट्र समितीचा मेळावा संपन्न

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज नेवासा: महाराष्ट्रातील एकही राजकीय पक्ष शेतकरी हिताचा निर्णय घेत नाही. सत्तेत आल्यानंतर सर्वजण आपआपल्या तुंबड्या भरतात.अबकी बार किसान सरकार त्यामुळे आता

तेलंगणात खऱ्या अर्थाने विकास घडवून आणणाऱ्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या

प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्यात येणार त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे युवा नेता शरद मरकड यांनी केले आहे.

24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या सभेचे नियोजन बैठक नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान हंडीनिमगाव व सुरेशनगर येथे पार पडली.यावेळी व्यासपीठावर पालम जिल्हा परिषद गटाचे सदस्य पवनभाऊ करवर,

त्रिवेणीश्वर देवस्थानचे रमेशानंदगिरी महाराज, विठ्ठल खोसे , दत्तात्रय बोरूडे, आदर्श साळवे व्यासपीठावर उपस्थित होते. शरद मरकड पुढे बोलताना म्हणाले की भारत राष्ट्र समिती या तेलंगाणा मधील मूळ पक्षाने तेलंगाणा राज्यात प्रचंड विकास कामे केली.तेलगंणा

मध्ये शेतकऱ्यांना २४ तास मोफत विज.पेरणीसाठी अगोदर एकरी १०,००० रू.मदत. नदी जोड प्रकल्पामुळे १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली. शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यास कुटुंबीयांना तात्काळ मदत. तेलंगणा एक समृद्ध राज्य झाले आहे.शेतकरी समृद्ध झाल्याने एकही आत्महत्या नाही.

महाराष्ट्रात पण तेलगंणा सारखं करणे सहज शक्य आहे.पण राज्यकर्त्यांची तशी मानशीकता नाही. म्हणुन तमाम शेतकरी पुत्रांनी कष्टकय्रांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बेगडी प्रेम दाखवणाय्रा सर्वच पक्षांना विचारले पाहिजे की, जे तेलंगणात होवू शकते ते महाराष्ट्रात का नाही होऊ शकत असा सवाल मरकड यांनी केले.

पवनभाऊ करवर बोलताना म्हणाले नऊ वर्षाच्या काळात तेलंगणात मुख्यमंत्र्यांनी आमुलाग्र बदल केला. दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न या बाबतीत त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. शेतकरी व विकास हे एकमेव माॅडेल डाेळ्यासमाेर ठेवत राज्यात पक्षाची वाटचाल सुरू आहे.

आपले गाव आपली शाळा शिक्षण योजना राबवून शिक्षणांवर भर दिला आहे .भारत राष्ट्रीय समिती हा पक्ष शेतकर्‍यांचा पक्ष म्हणून पुढे येत असुन शेतकर्‍यांकरिता तेलंगणा राज्यात ज्या योजना राबवल्या व त्यामुळे तेलंगणा राज्यातील शेतकरी सुजलाम, सुफलाम झाला. तसाच महाराष्ट्रातील शेतकरीही सुखी होण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करत आहेत पवनभाऊ करवर यांनी सांगितले.

बैठकी यशस्वी करण्यासाठी गणेश मुळे ,शरद क्षीरसागर , महेंद्र नजन, श्रीराम देशमुख,गोरख गुंजाळ आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!