Tuesday, January 18, 2022

आता ATM कार्डची गरज नाही; UPI अ‍ॅपवरद्वारेच काढा मशीनमधून पैसे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऑटोमेटेड टेलर मशीन्स अर्थात एटीएम मशीन्स बनवणाऱ्या एनसीआर कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी एक नवी सुविधा आणली आहे. त्यांनी याबाबत सांगितलंय की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल

कार्डलेस कॅश-विथड्रॉल सोल्यूशन त्यांनी लॉन्च केलंय. एटीएम कार्डशिवाय आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचे मोबाईल वापरून BHIM, Paytm, GPay इत्यादी कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे रोख रक्कम काढता येणार आहे.

सिटी युनियन बँकेने ही नवीन सुविधा वापरात आणण्यासाठी एनसीआरशी हातमिळवणी केलीये, असंही सांगण्यात आलंय. बँकेने क्यूआर कोड-आधारित इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेला अनुमती देण्यासाठी आपले 1,500 एटीएम

याआधीच अपग्रेड केले आहेत. कोणत्याही एटीएमवर मोबाइल फोनवर UPI अ‍ॅप वापरण्यासाठीचं हे एक पुढचे पाऊल आहे. एटीएम कार्ड न वापरता याचा वापर होऊ शकतो, अशी माहिती एनसीआर कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे.

असा होईल सुविधेचा वापरया नवीन सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचे मोबाईल वापरून BHIM, Paytm, GPay इत्यादी कोणत्याही UPI अॅपद्वारे रोख रक्कम काढता येणार आहे. यामध्ये ATM वापरताना कार्ड स्वाइप करण्याची किंवा बाळगण्याची गरज नाही.

वापरकर्त्याने स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे आणि त्याच्या किंवा तिच्या मोबाइल फोनद्वारे रोख पैसे काढण्याची परवानगी दिली की पैसे निघू शकतील. याप्रकारचे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी हा QR कोड सतत बदलला जाईल.

सध्या या प्रक्रियेतून पैसे काढण्याची मर्यादा ₹5,000 इतकी आहे. “हे UPI-आधारित असल्यामुळे त्याला कोणत्याही अतिरिक्त नियामक परवानगीची गरज नाहीये. कारण ही नवी सुविधा फक्त UPI अ‍ॅपचा विस्तार आहे असंही सांगण्यात आलंय.

सुविधा सुरक्षित आहे का?सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही सध्याची सर्वात सुरक्षित सुविधा आहे. दुसरे म्हणजे, ट्रॅक्शन डायनॅमिक QR कोडवर आधारित असल्याने, UPI अ‍ॅपशिवाय हा QR कोड कॉपी करण्याचा कोणताही मार्ग नाही. प्रत्येक व्यवहारामध्ये

 हा कोड बदलत राहणार आहे, म्हणून त्याला डायनॅमिक QR कोड म्हणतात, असंही सांगण्यात आलंय. या डायनॅमिक क्यूआर कोड-आधारित इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधा अपग्रेड केली असेल तर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!