Tuesday, November 30, 2021

चक्क नगर जिल्ह्यातून आठ गाढवं चोरीला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:बेलापूर येथून गाढवांची चोरी करणाऱ्य तिघा आरोपींना पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून 56 हजार रुपयांची आठ गाढवं ताब्यात घेण्यात आली आहेत. अविनाश ऊर्फ सोन्या

बाबासाहेब बोरुडे, जमशेद पठाण (रा. बेलापुर) आणि अहिनाथ जाधव अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

बेलापूर येथील रविंद्र आंबादास बोरुडे हे माती वाहतुकीचे काम करतात. या कामाकरीता त्यांच्याकडे चार गाढव आहे. त्याला पाथरे (ता. राहुरी) येथील माती वाहतूक करण्याचे काम मिळाल्यामुळे रविंद्र आपल्याकडील 4, रवी राजेंद्र रोकडे यांच्याकडील 2 आणि भाऊसाहेब विश्वनाथ नवनिधे यांची 2 अशी 8 गाढव घेऊन पाथरे येथे गेला.

माती वाहतूक केल्यानंतर रविंद्र बोरुडे यांनी आठही गाढवं पायाला दोरी बांधुन गावातील विठ्ठल मंदिरासमोर बांधली व रात्री बेलापुरला आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाथरे येथे गेले असता त्यांना बांधलेल्या ठिकाणी गाढवं आढळून आली नाही.

शोधाशोध केल्यानंतरही गाठवं आढळून न आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचा तपास करत असताना ही गाढवं पंढरपूर (जि. सोलापूर) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गाढवं व तेथील गाढवं विकत घेणारा अहिनाथ जाधव यास ताब्यात घेतले. त्यानंतर बेलापुरातून गाढवं विकणारा अविनाश ऊर्फ सोन्या

बाबासाहेब बोरुडे व टेम्पो चालक जमशेद पठाण (रा बेलापुर) या दोघांना ताब्यात घेतले. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!