Friday, January 21, 2022

नगर ब्रेकिंग संतापजनक:चारित्र्यावर संशय घेऊन …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत शारिरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना नगर तालुक्यातील वाळुंज पारगाव येथे घडली आहे. या प्रकरणी

नगर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह भायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभांगी शरद काकडे (वय २१, रा. वाळुंज पारगाव, ता. जि. अहमदनगर) असे

मयत महिलेचे नाव आहे. आरोपींमध्ये मयत शुभांगी काकडे यांचा पती शरद गोरख काकडे आणि भाया रविंद्र गोरख काकडे यांचा समावेश आहे. या संदर्भात वैशाली हरिश्चंद्र गुलदगड (रा. सिव्हील हडको, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

दि. ६ जानेवारी रोजी रात्री अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. शुभांगी काकडे सासरी नांदत असताना आरोपी शरद काकडे आणि रविंद्र काकडे हे त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तसेच जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. आरोपी शरद काकडे याला पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी न दिल्याने शारिरिक आणि मानसिक छळही करण्यात येत होता. पती आणि भायाच्या छळाला कंटाळून शुभांगी काकडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. उपनिरीक्षक बोराडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!