Tuesday, January 18, 2022

मित्राने आधी फोटो मागवले मग सुरू झाला भलताच खेळ तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही वर्षात सोशल मीडिया वापराच्या बाबतीत तरुणाईचा कल प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुणाशीही संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे.

अशात सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.

संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केली आहे.तसेच बदनामी रोखायची असेल तर दोन लाख रुपये दे अशी मागणी आरोपीनं पीडितेकडे केली आहे. यानंतर पीडित तरुणीने सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला आहे.

हा प्रकार कळताच पीडित तरुणीच्या वडिलांनी तातडीने सीटी चौक पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील arbazz_007 नावाच्या प्रोफाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

औरंगाबाद येथील सीटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुलीची एप्रिल 2019 मध्ये इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे संवाद वाढत गेल्यानंतर, आरोपीनं पीडित मुलीचा विश्वास संपादन केला. ओळख

वाढवून तिच्या नातेवाईकांचे मोबाइल नंबर गोड बोलून घेतले. तसेच तिला फोटो पाठवायला भाग पाडलं. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले.

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित मुलीचा मोबाइल हॅक करत सर्व डेटा चोरला. तसेच ‘सोशल मीडियावर होणारी बदनामी थांबवायची असेल तर दोन लाख रुपये दे’ अशी मागणी आरोपीनं केली. यानंतर घाबरलेल्या तरुणीने

सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीटी पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील arbazz_007 नावाच्या प्रोफाईलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!