Thursday, January 20, 2022

मोठी बातमी:सर्व कॉलेज्स आजपासून बंद, राज्य सरकारने काढला आदेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली आहे. त्यापाठोपाठ ओमायक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहे.

आता त्यापाठोपाठ राज्यातील सर्व महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम चालू करण्याबाबत शासनाने आदेश काढला आहे.

दोन दिवसांपूर्वीच उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कॉलेजेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारकडून तसा आदेश काढण्यात आला आहे.

सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्य्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसंच विद्यापीठांशी सलग्नित महाविद्यालतील ऑफलाईन पद्धतीने न घेता 15फेब्रुवारी, 2022 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात आदेश काढण्यात आले आहे.

राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेजेस हे येत्या 15 फ्रेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व कॉलेजेससाभ्य परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. सर्व विद्यापीठांनी तशी मान्यता दिली आहे.जळगाव, नांदेड अशा जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटीचा प्राब्लेम बघता या जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन परीक्षा होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यापीठांना हेल्पलाईन सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व वसतिगृह बंद करण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बंद करण्यात येणार नाहीत.

राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी बघता गेल्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे यंदाही सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं (Online Exams in Maharashtra) घेण्यात येणार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठांनी यासाठी होकार दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदाही कॉलेजेसच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!