Thursday, January 20, 2022

धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याची भाषा करणाऱ्या करुणा मुंडे यांचे नगरमध्ये घुमजाव म्हणाल्या…..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडेच शिवशक्ती सेना या आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना करुणा शर्मा-मुंडे यांनी वेळ पडल्यास आपले पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा नगरमध्ये केली होती. मात्र, आज

महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात संगमनेरमधून करताना त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला आहे. आपण स्वत: कधीही कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आपल्या मुलालाही

आपण राजकारणात आणणार नाही, मात्र भविष्यात त्याची इच्छा असेल तर मी अडविणार नाही, असेही त्या म्हणाल्या.करुणा मुंडे यांनी गेल्या महिन्यात नगरमध्ये शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची घोषणा केली होती. ३० जानेवारी २०२२ रोजी

नगरमध्ये मेळावा घेऊन पक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. गरज पडल्यास बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे यांच्या विरोधातही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.

आज त्या संगमनेरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या या भूमिकेत बदल केला. आपण स्वत: कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे त्या म्हणाल्या. याशिवाय आपल्या मुलालाही आपण

आताच राजकारणात आणणार नाही. मात्र शेवटी त्याच्या अंगातही राजकारण्याचे रक्त आहे. त्यामुळे भविष्यात त्याला वाटले तर तो राजकारणात येऊ शकतो. तेव्हा मी त्याला अडविणार नाही. मी त्याची आई आहे, मालकीण होऊ उच्छित नाही, असेही त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!