Tuesday, January 18, 2022

स्टेट बँकने या नियमामध्ये केला बदल, जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 फेब्रुवारी 2022 पासून 5 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS निधी हस्तांतरणावर कोणतेही शुल्क आकारणार नाही. पण यापेक्षा मोठी रक्कम

हस्तांतरित केल्यास जास्त शुल्क भरावे लागेल. या नियमाचा कमी पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांना फायदा होणार आहे. अशामध्ये जे लोक जास्त पैसे हस्तांतरित करतात त्यांना अधिक सेवा शुल्क द्यावे लागणार आहे….

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते, 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या IMPS द्वारे मनी ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​शुल्क आकारले जाईल. ऑक्टोबर 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) IMPS द्वारे व्यवहारांची

रक्कम 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.

IMPS म्हणजेच तात्काळ पेमेंट सेवा (Immediate payment service) ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (NPCI) एक महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे निधी हस्तांतरण 24X7 केले जाऊ शकते.

इंटरनेट बँकिंग (Internet banking) व्यतिरिक्त निधी हस्तांतरण मोबाइल बँकिंग अॅप्स (Mobile Banking Apps), बँक शाखा (Bank Branches), एटीएम (ATM), एसएमएस (SMS) आणि IVRS द्वारे केले जाते. RBIने वाढवलेली

दैनंदिन व्यवहार मर्यादा SMS आणि IVRSला लागू होत नाही. एसएमएस आणि IVRSद्वारे फक्त रु 5000 ट्रान्सफर केले जातात.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!