Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यात याठिकाणी सरपंच, उपसरपंच असे दुकानाला नाव नको मागणी..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात परमीट रूम, हॉटेल, चहाचे हॉटेल यांना सरपंच किंवा उपसरपंच अशी नावे दिल्याचे पाहायला मिळते. मात्र, अशी नावे देणे हा त्या संवैधानिक पदांचा अवमान असून ती रद्द करण्यात यावीत, अशी मागणी राहुरी तालुक्यातील

सोनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व नगर दक्षिण भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अंत्रे यांनी केली आहे. आपण स्वत: उपसरपंच असल्याने रस्त्याने अशी दुकानांची नावे पाहून चीड येते, असेही त्यांनी म्हटले आहे. याकडे

दुर्लक्ष केले तर उद्या मुख्यमंत्री किंवा अन्य घटनात्मक पदांच्या नावांचा अशा पद्धतीने केला जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.अंत्रे यांनी यासंबंधी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिली आहे. दिलेल्या

निवेदनात म्हटले आहे की, ‘अशी नावे कोणी दिली, त्यांची नोंदणी कोणी केली, याची चौकशी करून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. याशिवाय हिच मागणी अंत्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री तथा हसन मुश्रीफ यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडेही केली आहे.

 सरपंच या पदाला कायद्याने मोठे महत्त्व आहे. आपण सरपंचांना गावाचे प्रथम नागरिक समजतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८-५९ मधील कलम ३० नुसार ही पदे संवैधनिक आहेत. त्यांचा वापर अलीकडे व्यवसायाची नावे आणि जाहिरातीसाठी केला जात आहे.

कापड दुकान, बार, रेस्टॉरंट, चहाची हॉटेल अशा अनेक ठिकाणी ही नावे पाहायला मिळतात. अशी नावे घेऊन नोंदणीसाठी गेलेल्यांना अन्न व औषध प्रशासनाकडून अगर अन्य नोंदणी कार्यालयांकडून परवाने कसे मिळतात? हे योग्य आहे का? याची चौकशी करण्यात यावी.

रस्त्याने जाताना हॉटेल, ढाबा व अन्य ठिकाणी सरपंच, उपसरपंच अशी नावे वाचून अक्षरशः चीड येते. या संवैधानिक पदाच्या नावांचा अशा प्रकारे दुरुपयोग व अपमान होत आहे. प्रशासन आणि सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही

तर भविष्यात अनेक आस्थापना, बार, अथवा हॉटेलांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार अशी नावे दिलेली पहायला मिळतील. या प्रकारामुळे या महत्वाच्या पदाबरोबरच आपला महाराष्ट्र अपमानित होऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे, असेही अंत्रे यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!