Friday, January 21, 2022

घोडेगावात मराठा महासंघाकडून पत्रकारांचा सन्मान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुका मराठा महासंघाच्या वतीने घोडेगाव ता नेवासा येथे आयोजित आढावा बैठकीत पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

घोडेगाव येथे आज तालुका मराठा महासंघाची आढावा बैठक होती. बैठकीपुर्वी पत्रकार सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी तालुका एकता पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक दरंदले होते.नगर अर्बन बॅकेचे संचालक सचीन देसरडा,कांदा आडतदार व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक नाना येळवंडे, उद्योजक सचीन चोरडिया, नबाजी सोनवणे,सिताराम इखे,गोरक्षनाथ ब-हाटे,संभाजी शेंडगे,वसंत सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामराव पवार यांनी केले.स्वागत मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष डाॅ.ज्ञानदेव कोरडे यांनी केले.मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न व समस्या शासन दरबारी सांगून पाठपुरावा केला जाईल असे सांगून लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हातभार लावला जात असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात विनायक दरंदले यांनी सामाजिक व मुलभुत प्रश्नांना अग्रक्रम देत प्रशासनाचे लक्ष वेधले जातात मात्र अशा प्रश्नासाठी सामाजिक रेटा असेल तो प्रश्न लवकर मार्गी लागतो असे सांगून पत्रकार हा नेहमी समाजातील घटकांसाठीच आहे व राहणार असे सांगितले.दिलीप शिंदे,अशोक येळवंडे, सचिन देसरडा यांचे भाषण झाले.

कार्यक्रमात दत्ता भिंगारे,दिलीप शिंदे, देवीदास चौरे, दत्ता भिंगारे,नवनाथ कुसळकर, महेश पटारे, अविनाश येळवंडे, बाळासाहेब येळवंडे, दादा दरंदले रावसाहेब मरकड,सुरेश दारकुंडे यांचा शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देवून मराठा महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!