छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर येथील अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते
जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व शंकर अण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत हैदराबाद येथे बुधवार दि. १९ रोजी भारत राष्ट्र समिती(बीआरएस) मध्ये प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यात फिरोज पटेल, सीमा राठोड, जगदीश बोंडे, विजय विल्हेकर, अनिल साकोरे, सुनील
शिरेवार, कुलदीप बोंडे, सुनील वाकोडे, सुनील पडोळे, कोल्हे ज्ञानेश्वर गादे, संजय भोसले, उत्तम धोटे, अनिल वाकोडे यांच्यासह शंकर अण्णा धोंडगे यांच्या अनेक सहकाऱ्यांचा प्रवेश झाला.