Monday, January 17, 2022

आमदार मोनिका राजळेंवर गंभीर आरोप…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पाथर्डी नगरपालिका, अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जवळ आल्याने पाथर्डी तालुक्यात राजकीय आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे

यांनी पाथर्डी नगरपालिकेतील विकासकामासाठी आमदार मोनिका राजळे व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप केला आहे.पाच वर्षात पालिकेला 120 कोटींचा निधी मिळाला. मात्र, या निधीत आमदार मोनिका राजळे व पालिकेच्या

पदाधिकाऱ्यांनी टक्केवारी घेत घोटाळे केले. या घोटाळ्यांची चौकशी करावी, अशा सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ढाकणे म्हणाले की, मागील पाच वर्षांतील 15 कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी तनपुरे यांच्याकडे केल्या नंतर हे आदेश दिले आहेत. शिकलेला उमेदवार दिला म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला.

मात्र, तुम्ही सर्वांनी घोटाळे केल्याने जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. तुम्हाला उघडे पाडल्या शिवाय आता स्वस्थ बसणार नाही. या सर्व घोटाळ्याची जबाबदारी राजळे यांनी स्वीकारावी अन्यथा समोरासमोर चर्चा करायची माझी तयारी आहे.

कल्पकता व इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शहर विकासकामांच्या बाबतीत मागे गेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत सत्य बाहेर येईल. नागरिक सध्या तोंड दाबून बुक्याचा मार खात आहेत. नागरिक करांच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देतात.

मात्र, त्या बदल्यात तुम्ही लोकांना काय दिले आहे. पालिका स्थापने पासून एव्हडा गलथान कारभार कधीही झाला नाही. पाण्याच्या टाकीचे काम दर्जाहीन चालू असल्याचे तुमचेच नगरसेवक सांगतात. जेसीबी, निऱ्हाळी नाट्यगृह, मुंडे जॉगिंग पार्क या सर्व कामात मोठा घोटाळा झाल्याचेही ढाकणे म्हणाले.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!