Saturday, January 22, 2022

नगर ब्रेकिंग:वडील व मुलीची गळफास घेवून आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शेतातील घरात नामदेव बबन भुतांबरे (वय 40) व मनिषा नामदेव भुतांबरे (वय 14) रा. नादूंर खंदरमाळ तरसेवाडी, ता. संगमनेर, हल्ली रा. बाळापूर या वडील व मुलीने

शनिवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुतांबरे कुटुंब हे कामानिमित्त उंबरी बाळापूर येथे आले होते. शनिवारी दुपारी बाळापूर शिवारातील पढंरीनाथ दत्तू सातपुते यांच्या गट नंबर – 170 मधील

घरामध्ये नामदेव भुतांबरे व मनिषा भुतांबरे या दोघांनी तारेच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. बाळापूरच्या कामगार पोलीस पाटील वैशाली मैड यांनी आश्वी पोलिसांना याबाबत खबर दिली. यानंतर पोलीस

निरीक्षक सुभाष भोये व त्याच्या सहकार्‍यानी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली. यावेळी सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, अशोक भुसाळ, अनिल भुसाळ आदींसह परिसरातील नागरीक घटनास्थळी उपस्थित होते.

दरम्यान वडील व मुलीने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नसून आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिदें हे करत आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!