Tuesday, January 18, 2022

शिर्डीच्या साई मंदिराबाबत पसरली अफवा; प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मंदिरांबाबत अद्याप नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही.

असं असताना शिर्डीच्या साई मंदिराबाबत सोशल मीडियात अफवा पसरल्याने मंदिर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे.शिर्डीतील साई मंदिर सध्या आहे त्याच पद्धतीने सुरू राहणार असून नवे नियम लागू केल्याच्या सोशल मीडियातील

अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन साईबाबा संस्थान मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.साईबाबांचे मंदिर शनिवार व रविवार रोजी बंद राहणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र मंदिराबाबतचे अद्यापपर्यंत

कुठलेही आदेश शासन स्तरावरून निर्गमित झालेले नाहीत. त्यामुळे अशा अफवांवर भाविकांनी विश्वास ठेवू नये, असं मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे.शासनाकडून यासंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यास याबाबत साईबाबा संस्थान मंदिर प्रशासनाकडून

भाविकांच्या माहितीस्तव तशी माहिती जारी केली जाईल, असं साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितलं आहे.दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर

मंदिराबाबत पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मंदिर परिसरातील व्यावसियांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!