Tuesday, November 30, 2021

मंत्री तनपुरे यांनी केली नवी घोषणा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतदारसंघात रुग्णांच्या सेवेकरीता अधिक बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राहूरीतील बालाजी मंगल कार्यालय येथे राहुरी डेडिकेटेड कोविड केअर सेंटर ची उभारणी पूर्ण झाल्याची माहिती राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

तसेच श्री. सतीश तनपुरे यांच्या पुढाकाराने शुभ कीर्ती मंगल कार्यालय येथे कोव्हिड केअर सेंटरची उभारणी केली आहे. गुरुवारी दि 15 रोजी शुभ कीर्ती मंगल कार्यालयातील केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.

नागरिकांनीही आपले शहर आपला तालुका कोरणा मुक्त ही घोषणा करून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पाळावेत असे तनपुरे म्हणाले .बालाजी मंगल कार्यालय येथे एकूण 70 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी 20 बेड्स हे ऑक्सिजन युक्त आहेत.

ना तनपुरे यांनी बालाजी मंदिरातील सेंटरला बुधवारी भेट दिली यावेळी तहसीलदार एफ आर शेख, संतोष आघाव , नंदकुमार तनपुरे , पांडुरंग उदावंत उपस्थित होते. शुभ कीर्ती मंगल कार्यालय येथे 100 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत .

उत्तम आरोग्य व्यवस्था, तज्ञ डॉक्टर्स, जेवणाची सुविधा येथे उपलब्ध असणार आहे . त्याचप्रमाणे तिसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत देखील मागील 25 व उद्यापर्यंत 25 अश्या सुमारे 50 बेड्स साठी आवश्यक ती सर्व सामुग्री पुरविण्यात आली आहे.

आहे त्या रुग्णांना योग्य उपचार देणे आणि कोरोनाचा फैलाव थांबवणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे. नागरीकांनी देखील शासनाचे नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!