Thursday, January 20, 2022

UPIद्वारे तुमचेही पैसे ट्रान्सफर होत नव्हते? ‘हे’ आहे त्यामागचं कारण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज तुम्ही गुगल पे, फोन पे अथवा तत्सम स्वरुपाच्या ऍप्सद्वारे यूपीआय प्रणालीचा वापर करुन पैसे पाठवण्याचा प्रयत्न करत असाल, मात्र तुमचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला असेल. हो ना? मात्र, आता याचं कारण समोर आलंय.

आज रविवारी सुमारे एक तासाच्या कालावधीसाठी युपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस बंद झाले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली आता पुर्ववत झाली आहे.

NPCI ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटलंय की, “अधूनमधून येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे” या सेवा बंद पडल्या आहेत. पुढे त्यांनी म्हटलंय की, “अधूनमधून येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे UPI युझर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल

आम्ही दिलगीर आहोत. मात्र, UPI आता कार्यरत आहे आणि आम्ही सिस्टमचे बारकाईने निरीक्षण करत आहोत.UPI सर्व्हर डाउन असल्याची तक्रार अनेक युझर्सनी ट्विटरवर केली होती. डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म जसे की

Google Pay आणि Paytm वापरून कोणतेही व्यवहार करता येत नव्हते. यासंदर्भात टेक समीक्षक नितीन अग्रवाल यांनी ट्विट केलं होतं की, “होय, ICICI बँकेने माहिती दिलीय की, त्यांची UPI सिस्टीम मेंटेनन्स अ‍ॅक्टिव्हिटींमुळे बंद आहे. मात्र, इतर अॅप्सबद्दल मात्र खात्रीलायक माहिती नाही.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!