Friday, January 21, 2022

आजपासून केंद्र सरकार विकणार स्वस्त सोनं, या तारखेपर्यंत संधी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमचा २०२१-२२ चा नववा टप्पा आजपासून सुरु होणार आहे. या योजनेअंतर्गत १० जानेवारी ते १४ जानेवारीपर्यंत तुम्ही

स्वस्तात सोने खरेदी करू शकता. हे सोने तुम्हाला हातात मिळणार नाही. हे रोखे सर्व बँका, मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक

एक्सचेंज लिमिटेड यांच्यामार्फत विकले जातील. याचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असतो आणि ८ वर्षांनी मॅच्युअर होते. जर तुम्हाला पाच वर्षानंतरच विकायचे असेल तर तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा करानुसार २०.८० टक्के शुल्क भरावे लागेल.

जर तुम्ही ८ वर्षे ठेवले आणि बॉण्ड्स मॅच्युअर झाले, तर तुम्हाला ते विकून कमावलेल्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

भारत सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेचा हा नववा टप्पा आहे.

तुम्हाला पाच दिवस म्हणजे १४ जानेवारीपर्यंत खरेदी करण्याची संधी मिळेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या योजनेची किंमत ४,७८६ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे.

केंद्र सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना किमतीपेक्षा ५० रुपये प्रति ग्रॅम सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जाचे पेमेंट डिजिटल मोडद्वारे केले जाते.

खरेदीसाठी इश्यू किंमत सेबीच्या अधिकृत ब्रोकरला द्यावी लागेल.

बाँड विकल्यानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा होतात.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड इश्यू किमतीवर वार्षिक२ .५०% निश्चित व्याज दर देतात.

ही रक्कम दर सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होते.

या योजनेत स्लॅबनुसार कर भरावा लागेल.

गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

गोल्ड बाँडसाठी सोन्याचा दर ९९९ शुद्ध सोन्याच्या बंद किंमतीच्या सरासरीच्या बरोबरीचा असेल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!