Thursday, August 11, 2022

ऊसतोड कामगारांचे मोबाईल चोरांना नेवासा पोलीसांकडुन अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील बेल पिंपळगाव शिवरात ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरांना नेवासा पोलीसांनी श्रीरामपूर सायबर सेलच्या मदतीने अटक केली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,
दि.4 जानेवारी 2022 रोजी फिर्यादी आकाश सुपलु राठोड रा.बेलपिंपळगाव, ता.नेवासा यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती कि बेलपिंपळगाव शिवरात ऊस तोडणीकरीता इतर परिवारासह आलेलो असुन दि.2 जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्याने आमचे कोपीवरील राहणारे लोकांचे सुमारे 14 हजार रुपये किंमतीचे 3 मोबाईल चोरुन नेले आहेत. सदर बाबत नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 12/2022 भादवी 379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोना बबन तमनर हे करत होते.
गुन्ह्यात चोरीस गेले मोबाईलचा अप्पर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने माहीती प्राप्त करुन पुराव्याच्या आधारे तपास करुन आरोपी नामे समिर भाउसाहेब भोसले (वय 20वर्षे) रा. मुकिंदपुर ता.नेवासा यास अटक करण्यात आली असुन त्याच्या कडून एक बिगर नंबरची पल्सर मोटार सायकल तसेच गुन्ह्यात चोरीस गेले 3 मोबाईल जप्त करण्यात आले असुन आरोपीताकडुन आणखी अशाप्रकारचे गुन्ह उघड होण्याची दाट शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल,अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार याचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोना बबन तमनर, पोना अशोक कुदळे, पोकॉ अंबादास गिते, पोकॉ केवल रजपुत, पोकॉ योगेश आव्हाड तसेच अपर पोलीस अधिक्षक सो श्रीरामपुर यांचे सायबर टीमचे पोना फुरकान शेख, प्रमोद जाधव यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!