Saturday, January 22, 2022

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या माजी सरपंचाने धुडकवल्यात मंत्रिपदासह खासदार, आमदारकीच्या राजकीय ऑफर्स

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्याच्या परिस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेले अंत्योदयचे विचारच आज देशास तारू शकतात. तळागाळातील नागरिकांना उभे करत सुरक्षित करण्याचे काम पतसंस्था चळवळ करत आहे. त्यामुळे पतसंस्था व्यवस्था टिकली पाहिजे.

पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे कामकाजही दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारावरच चालत असल्याचे पाहून आनंद होत आहे.यावेळी बोलताना , आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांकडून आमदार खासदार व मंत्रिपदाच्या ऑफर आल्या, मात्र सर्व धुडकावत

मी सामाजिक कामांनाच महत्व दिले. सामाजिक कामांमुळेच मी आज राष्ट्रीय स्तरावर काम करत पूर्ण देशाची सेवा करू शकलो, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे नूतन चेअरमन सुरेश वाबळे, संचालक कडूभाऊ काळे, शिवाजीराव कापळे, अजिनाथ हजारे तसेच भाजपचे

नवनिर्वाचीत नगरसेवक प्रदीप परदेशी व अर्बन बँकेच्या संचालकपदी महेंद्र गंधे यांची निवड झाल्याबद्दल पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, सचिव विकास पाथरकर, ज्येष्ठ संचालक सुधीर पगारिया, प्रा.मधुसूदन मुळे, सुनील रामदासी, राजेंद्र चोपडा व अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सुरेश वाबळे म्हणाले, पतसंस्था चळवळ शहरी व ग्रामीण भागातही भरीव योगदान देत आहे. मोठ्याप्रमाणात सावकार शाही मोडीत काढण्याचे काम पतसंस्था चळवळ करत आहे. मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन मुळे पतसंस्थांच्या कारभाराला शिस्त लावण्याचे काम होत असल्याने ही चळवळ पारदर्शक होत आहे.

प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोपटराव पवार यांचा उचित सन्मान केला आहे. त्यांना पद्मश्री मिळायचा अभिमान दीनदयाळ परिवाराला आहे. पवार यांची जन्म व कर्मभूमी नगर शहर आहे. मात्र आज शहराची

झालेली बिकट अवस्था याआधी कधीही झालेली नव्हती. त्यामुळे पोपटराव पवार यांनी आता शहरत लक्ष घालावे. नगर शहराला दत्तक घेवून हिवरेबाजार प्रमाणे नगर शहरही विकसित आदर्श करावे. हिवरेबाजार मुळे त्यांना पद्मश्री मिळाली तर नगर शहारामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळेल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!