Tuesday, November 30, 2021

रेमडेसेवीरचा आणखी २ ते ३ दिवस तुटवडा जाणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :कोरोनाबाधितांना बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. या संदर्भात आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

६ लाख २० हजारच्या वर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रेमडेसेवीरचा आणखी २ ते ३ दिवस तुटवडा जाणार आहे. पुरवठा सुरळीत होण्याकरता आणखी 2-3 दिवस लागणार असल्याची माहिती राजेंद्र शिंगणेंनी दिली आहे.

आता या कंपन्यांच्या सीईओ आणि एमडी यांच्याबरोबर बैठक झाली आहे. ३७ ते ३८ हजार दिवसाला पुरवठा होतो, तो वाढवला जाणार आहे. १९ एप्रिल -२० एप्रिल नंतर पुरवठा सुरळीत होईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.

रेमडेसेवीरच्या निर्यांत बंदी घातली आहे. निर्यात बंदी घातलेल्या कंपन्यांना महाराष्ट्रात त्यांचा माल विकण्याची परवानगी दिली आहे. ८ ते १० कंपन्यांचा निर्यातीवर बंदी आहे, .

त्यांचा रेमडेसेवीरचा साठा पडून आहे, तो महाराष्ट्रात जास्तीत जास्त मिळावा यासाठी त्या कंपन्यांबरोबर आमचे अधिकारी संपर्क करत आहेत.

रेमडेसेवीरची उपलब्ध कमी आहे, काही कंपन्यांनी महाराष्ट्रात एकही इंजेक्शन्स पुरवलेले नाही. सरकारी रुग्णालयात रेमडेसेवीरची सुदैवाने कमतरता नाही. पण खाजगी रुग्णालयात तुटवडा जाणवत आहे. पुण्यात तुटवडा जाणवतोय तो दूर करण्यासाठी मी आयुक्तांना सूचना करेन, असं देखील राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!