Thursday, January 20, 2022

कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ज्या व्यक्‍तींनी Covid-19 प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण केले आहेत, त्यांना आजपासून सोमवारी संरक्षित (बूस्टर) डोस टोचला जाणार आहे.

 हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील को-मॉर्बिड व्यक्तींना तो डोस दिला जाणार आहे. कोरोना बाधित रुग्णाला तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जाईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

संरक्षित लस घेण्यासाठी संबंधित व्यक्‍तीने दोन्ही डोस घेऊन किमान 39 आठवड्यांचा कालावधी पूर्ण करणे आवश्‍यक आहे. दोन्ही वेळी जी लस टोचली आहे, त्याच लसीचा डोस घेणे बंधनकारक आहे. कॉकटेल डोस देण्यास अजूनही सुरवात झालेली नाही.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी लसीची वर्धक मात्रा सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी महापालिका परिसरातील

कोविड कंट्रोल रूममध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील 14 नागरी आरोग्य केंद्रामध्ये, रेल्वे हॉस्पिटल , विमा रुग्णालय , एसआरपीएफ कॅम्प  व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 18 वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लसीचा पहिला

पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच त्या ठिकाणी ऑनलाइन व ऑन द स्पॉट बूस्टर डोस देण्याचीही सोय करण्यात आली आहे. दरम्यान, पूर्वीचे डोस घेताना ज्या मोबाईल क्रमांकावरून नोंदणी केली आहे, तोच क्रमांक सांगावा, असेही स्पष्ट

करण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही डोस घेऊन ज्यांचे नऊ महिने पूर्ण होतील, त्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!