Saturday, January 22, 2022

संगमनेरच्या तरूणाकडून नेवाशाच्या तरूणीवर ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मूळची नेवासा तालुक्यातील व सध्या अहमदनगर शहरात राहत असलेल्या तरूणीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या

फिर्यादीवरून राहुल शिवाजी वाकळे (वय 28 रा. कौठे बुद्रुक ता. संगमनेर) या तरूणाविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी तरूणीची राहुल वाकळे सोबत जून 2021 मध्ये ओळख झाली होती.

त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधून जवळीक वाढविली. मी नवीन पिकअप व्हॅन घेतली असून तुला पेढे द्यायचे आहेत, असे आरोपीने तिला मोबाईलवर सांगितले. परंतु तिने भेटण्यास नकार दिला. त्यामुळे तो गाडी घेऊन तिच्याकडे भेटायला गेला.

अहमदनगरमधील एका ज्युस बारमधून ज्युस पार्सल घेतले. तेथून फिर्यादी व राहुल विळद घाटात गेले. तेथे त्यांनी ज्युस पिले. त्यानंतर तरूणीला भोवळ आली. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. तरूणीने शुध्दीवर आल्यावर

 त्याने तिला ‘माझे काम झाले. तुझे फोटो सुध्दा काढले आहेत. या घटनेबाबत वाच्यता केली तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी व तुझ्या कुटूंबाची बदनामी करील’, अशी धमकी दिली. ही घटना जून 2021 मध्ये घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान गुन्हा दाखल होताच अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश कवाष्टे, अभय कदम, संतोष गोमसाळे, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, नितीन शिंदे

 यांच्या पथकाने संगमनेर येथून आरोपी वाकळे याला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक कातकडे करीत आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!