Friday, January 21, 2022

महाराष्ट्रातील निर्बंध कधी शिथिल होणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात दिवसागणित कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नक्कीच चिंतेचा विषय आहे. प्रत्येकानं संसर्ग टाळण्यासाठी सतर्क राहून काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. 

आज मनसुख मांडवीय यांच्या सोबत 2 तास बैठक झाली यात 5 राज्याचा आढावा झाला.राज्याततील स्थिती आणि आढावा या बैठकीत घेण्यात आला. आज 1 लाख 73 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. 5 हजार 400 लोकांना ऑक्सिजन लागणारे रुग्ण आहे 13 टक्के लोक माईल्ड स्थितीत आहे.

ICU बेड 38 हजार आहेत. आयसीयू बेड आणि16 हजार व्हेंटिलेटर बेड राज्यात उपलब्ध आहे. 1 लाख 34 हजार ऑक्सिजन बेड राज्यात उपलब्ध आहेत. टेस्टिंग, ट्रेसिंग,ट्रीटमेंट, वाढवण्याच्या मांडवीय यांच्याकडून राज्याला सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती टोपेंनी दिली.

ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका सर्वात जास्त असल्याचंही सांगितलं आहे. जिथे लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे तिथे कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे.

एक पिक पॉईंट आहे जिथे कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढतात त्यानंतर पुन्हा परिस्थिती नियंत्रणात येते. ही परिस्थिती इतर देशांमध्येही आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली की, निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार केला जाईल.

राज्यात आठवड्याभरात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचं प्रमाण 15 टक्क्याहून अधिक आहे. अशावेळी 15 ते 20 दिवसांसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात निर्बंध शिथिल करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!