Thursday, October 5, 2023

“चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा”

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गोंधळ असल्याचे पाहायला मिळाले असून चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हाचे समन्वयक कमलेश बाबासाहेब नवले यांनी केली आहे.

मंगळवारी (दि.18 एप्रिल) मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र, त्यांनी त्याची उत्तरे देता आली नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हाचे समन्वयक कमलेश बाबासाहेब नवले म्हणाले. चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही नवले यांनी यावेळी केला आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हाच्या वतीने येत्या सोमवार दि.1 मे रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता भेंडा बसस्थानका समोर चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमीवर जोडे मारो आंदोलन करण्यात येईल
असे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.
त्यामुळेच समितीच्या बैठकीमध्ये गोंधळाचा वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!