Thursday, January 20, 2022

नगर जिल्हा बँकेकडून व्याज परतावे देण्यास सुरुवात…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नियमीत पिक कर्जाची वेळेवर परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना जिल्हा बँकेकडून गेल्या दोन वर्षाचे व्याजाचे परतावे देण्यात आले नव्हते. दैनिक सार्वमतमध्ये या मथळ्याचे वृत्त प्रकाशित होताच बँकेने केंद्र शासनाकडून मिळालेले

2018-19 व 2019-20 या दोन वर्षाचे 3 टक्के व्याज परतावे शाखा व सोसायट्यांकडे वर्ग केले असून या आठवड्यात शेतकर्‍याच्या बचत खात्यावर या रकमा जमा होणार आहेत.

शेतकर्‍यांची कामधेनू समजल्या जाणार्‍या जिल्हा बँकेने 2022 हे वर्ष वसुली वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तसेच 31 मार्च 2022 पर्यंत सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून वाटप केलेल्या कर्जाचे 100 टक्के व्याज वसुल करण्याचे उद्दीष्ठ बँकेच्या शाखांसह सेवा सोसायट्यांना देण्यात आले आहे.

शासनाने शुन्य टक्के व्याजाने पिक कर्जाची घोषणा केली असतांना गेल्या दोन वर्षापासून पोटाला चिमटा घेवून, नैसर्गिक समस्यांना सामोरे जावून नियमीत कर्ज भरूनही शेतकर्‍यांना बँकेकडून व्याजाचे परतावे देण्यात आलेले नव्हते.

जिल्हा बँकेकडून मार्चअखेर 100 टक्के व्याज वसुलीचे उद्दीष्ठ, मात्र शेतकर्‍यांना दोन वर्षाचे व्याजाचे परतावे नाहीत. या मथळ्याचे वृत्त प्रकाशीत होताच, बँकेकडून व्याज परतावे देण्यास सुरूवात झाली आहे.शेतकर्‍यांकडून वसुल केलेल्या 6 टक्के व्याजापैकी 3 टक्के राज्य

सरकार व 3 टक्के केंद्र सरकार प्रोत्साहन म्हणून शेतकर्‍यांना परत देते. यापैकी बँकेला केंद्र सरकारकडुन मिळालेले 2018-19 व 2019-20 या दोन वर्षाचे3 टक्के व्याज परताव्यांच्या रकमा बँकेने संबंधीत

शाखा व सेवा सोसायट्यांकडे पाठविल्या असून आठवडाभरात सभासदांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!