Friday, January 21, 2022

भारतात कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोना विषाणू संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये थोडी घट झाल्याचं दिसून आलं आहे.मात्र,कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या

आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 1 लाख 68 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 277 जणांचा मृत्यू झालाय. ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 461 वर पोहोचली आहे.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 68 हजार 63 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 277 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 8 लाख 21 हजार 446 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार केवळ 3 राज्यांमध्ये 19 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीचा समावेश आहे. महाराष्ट्रात 33 हजार 470, पश्चिम बंगालमध्ये 19 हजार 286 ,

दिल्लीमध्ये 19 हजार 166 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडू राज्यात 13 हजार 990 आणि कर्नाटकमध्ये 11 हजार 698 रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

एकीकडे कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढत आहे. ओमिक्रॉन वेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4461 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!