Friday, January 21, 2022

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ईडीचे सहसंचालक राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएस घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी टीका केली होती. आता भाजप नेतेअतुल भातखळकर यांनी नबाव मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तसेच मोदींचे PMO मधील सचिव ए.के. शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून नवाब मलिक यांनी ट्विट करत या एजन्सीमध्ये काम करणारे ते भाजपचे कार्यकर्ते होते.

अशा पद्धतीने अजून बरीच कामे आहेत. या भाजप कार्यकर्त्यांबद्दल विरोधी पक्ष जे बोलत होते ते आता खरे ठरू लागले आहे. अशी टीका केली होती.नवाब मलिक यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते अतुल भातखळकरांनी नवाब मलिक

यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे, मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही अशी घणाघाती टीका केली आहे. तसेच तुम्ही कुठली इंजेक्शन घेता हे तर साऱ्या जगाला माहिती आहे.

नसेल माहिती तर तुमच्या जावयाला विचारा. आधी तुमच्या घरात काय सुरूय ते बघा आणि मग इतर ठिकाणी लक्ष घाला, तुमचे आमदार काय करत आहेत ते आधी बघा आणि मग भाजपवर बोलण्यासाठी तोंड उघडा, अशी टीका केली आहे.

नवाब मलिक सतत ईडीवरून भाजपला टार्गेट करताना दिसून येतात, तर त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून पलटवार होताना दिसून येतात. गेल्या काही दिवासांपासून एनसीबी आणि ईडीवरून

 नवाब मलिक यांनी सतत भजापवर टीका केली. भाजप नेत्यांनीही वेळोवेळी त्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आता भातखळकरांच्या वक्तव्याने पुन्हा हा वाद वाढला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!