Monday, January 17, 2022

अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम देतो सांगून काढले अर्धनग्न फोटो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या अनेकांचे रोजगार बुडाले. आता कुठे लोकांच्या हाताला काम लागले आहे तर पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या एका बंगाली अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये आपण कास्टिंग

डायरेक्टर आहोत असं सांगून फसवणाऱ्या एका 24 वर्षांच्या भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने या अभिनेत्रीचे अर्धनग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे लुटत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश तिवारी (वय 24) असं या तरुणाचं नाव आहे. मालाड सायबर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. या भामट्याने फेसबुकवर आपण कास्टिंग डायरेक्टर आहे असं सांगत होता. या आरोपीने आधी काही ठिकाणी काम सुद्धा केले आहे.

तरुणींना तो वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं सांगून त्यांचे फोटोशूट करायचा. त्यानंतर त्यांचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचा. या आरोपीने आपण नेटफ्लिक्स प्रोडक्शन हाऊसमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे असंही सांगत होता.

एका बंगाली अभिनेत्रीने डिसेंबर 2021 महिन्यात फेसबुकवर संपर्क केला होता.  त्यानंतर या अभिनेत्रीला मुंबईला भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं. त्यानंतर ओम तिवारीने या अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं आमिष दिलं.

त्यानंतर या अभिनेत्रीचे ऑडिशनच्या नावावर फोटोशूट केले. त्यानंतर या अभिनेत्रीला त्याने काम तर दिले नाही, उलट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली.पीडित तरुणी हे कोलकाता येथील राहणारी आहे. तिने याआधी बंगाली

सिनेमात काम केलं होतं. कोरोनाच्या काळात हातात काम नसल्यामुळे ती मुंबईत काम करण्याच्या इराद्याने आली होती. पण, आरोपी ओम तिवारीने त्याचा गैरफायदा घेत पैसे वसुलीचे काम केले.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!