Thursday, January 20, 2022

त्या व्यक्तीला कोरोना चाचणीची गरज नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोना आणि ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस होत वाढत आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून कोरोना चाचणीबाबत नवी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग आणि टेरेसिंग वाढवण्यावर प्रशासन भर देत असतो. कोरोना चाचणीविषयी केंद्र सरकारने नवीन सुचना जारी केली आहे. कोरोना रुग्ण संपर्कातील व्यक्ती अतिजोखमीच्या गटातील नसेल तर त्यास कोरोना चाचणी

करण्याची आवश्यकता नाही, असा दिलासादायक निर्णय केंद्राने घेतला आह़े. कोरोना चाचण्यांसंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत़.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनाही चाचणी करावी लागते मात्र, रुग्ण संपर्कातील व्यक्ती वयोवृध्द अणि सहव्याधीग्रस्त नसेल तर चाचणी करण्याची गरज नाही़ तसेच आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक नाही, असे ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केल़े आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रुग्णांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या़ त्यानुसार कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बाधित असल्याचे आढळल्यानंतर सातव्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडणे शक्य होणार आहे.

रुग्ण बाधित आल्यानंतर सलग तीन दिवस त्याला ताप नसेल तर चाचणी न करता त्याला घरी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. रुग्णांना घरी सोडल्यानंतर पुढील सात दिवस त्यांनी आपल्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे, तसेच घरी राहतानाही मास्कचा वापर करावा.

घरी सोडल्यानंतर ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण यांपैकी कोणतेही लक्षण सौम्य किंवा तीव्र स्वरूपात जाणवल्यास त्या रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!