Saturday, January 22, 2022

राधाकृष्ण विखे पाटलांचं शरद पवारांना आव्हान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात सर्वच विभागातील भरती प्रक्रियेत घोटाळे झाले आहेत. आता विद्यापीठांमध्‍येही अशाच पद्धतीचे घोटाळे करुन नवे कुरण निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न तर नाही ना? या विद्यापीठ सुधारणा विधेयकातून विद्यापीठांना

खऱ्या अर्थाने उर्जितावस्‍था येईल का? याबाबत राज्‍याच्‍या जाणत्‍या राजांनी जाहीरपणे एकदा तरी सांगावे,’ असं आव्हान भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता दिलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी आधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने सभागृहात मांडलेल्‍या विद्यापीठ सुधारणा विधेयकाला भाजपने सर्वच स्‍तरावर विरोध सुरू केला आहे. याचाच एक भाग म्‍हणून युवा मोर्चाच्‍या वतीने हे विधेयक मागे घ्‍यावं,

या मागणीसाठी मुख्‍यमंत्र्यांना संपूर्ण राज्‍यातून एक लाख पत्र पाठवण्‍याचं आंदोलन सुरू करण्‍यात आलं आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघातून या आंदोलनाची सुरुवात लोणी बुद्रूक येथील पोस्‍ट कार्यालयात पत्र टाकून विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली युवा मोर्चाच्‍या वतीने करण्‍यात आली. त्यानंतर विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

आजच विद्यापीठातील निविदा प्रक्रिया, भरती या संदर्भात मंत्र्यांच्‍या कार्यालयातून कुलगुरुंना फोन सुरू झाले आहेत. महाराष्‍ट्राच्‍या इतिहासात असं कधी घडलं नव्‍हतं. एकप्रकारे विद्यापीठांमध्‍ये कंत्राटे मिळवण्‍यासाठी बाजार भरवण्‍याचाच हा प्रयत्‍न आहे.

उद्याच्‍या पिढीच्‍या उज्‍वल भविष्‍यसाठी हे विधेयक आम्‍ही कदापीही मंजूर होऊ देणार नाही. हा काळा कायदा तातडीने सरकारने मागे घ्‍यावा अन्‍यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा विखे पाटील यांनी दिला.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!