Friday, January 21, 2022

मोठी बातमी:13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत – शरद पवार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा उतरणार आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली. तसेच आगामी काळात भाजपला आणखी मोठे झटके बसणार असून 13 आमदार भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

त्यामुळे आता हे 13 आमदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असून येथे निवडणुकीपूर्वी भाजपला एकामागेएक असे झटके बसताना दिसत आहेत. आजच उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री असलेले

स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनत पक्षाला रामराम करत स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे.स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला यावर

शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटलं, स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा देत त्यांनी समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचं म्हटलं. त्यांच्यासोबत 13 आमदार आणि आणखी काही सहयोगी

 त्यांना समर्थन देणार असल्याचंही म्हटलं आहे. तुम्ही पाहाल येत्या काळात दररोज एक-एक नवा चेहरा भाजपतून बाहेर पडेल आणि इकडे येईल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!