Saturday, January 22, 2022

त्यांना गडाखांना शिव्या देणे एवढेच भांडवल…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहे. नेवासे तालुक्यात गडाख कुटुंबाचे वर्चस्व आहे.

गडाखांवर भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडून टीका होत आहे. या टिकेला जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी उत्तर दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.सुनील गडाख म्हणाले, “विकास कामांची कुठलीच दृष्टी समोर न ठेवता फक्त गडाखांना

शिव्या देण्यात धन्यता मानली जात आहे. फक्त अमावस्या, पौर्णिमेलाच दिसणाऱ्या या नाटक कंपनीला सर्वांनी ओळखणे गरजेचे आहे”, असे नाव न घेता सुनील गडाख यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर टीका केली.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये शंकरराव गडाखांना मानाचे स्थान दिले. हा विश्वास सार्थ होण्यासाठी तालुक्यात व जिल्ह्यात भगवा फडकण्यासाठी जीवाचे रान केले जाईल असे सांगून गडाख यांनी

मंत्री गडाख यांनी पाचशे ते सहाशे कोटीची कामे तालुक्यात आणल्याने विरोधकांच्या तंबूत भुकंप झाला असल्याचे सांगितले.हिवरेबाजार व राळेगणसिध्दी आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध आहेत .

याचप्रमाणे खरवंडी जिल्हा परिषद गटाला मॉडेल गट करुन देशात हा गट नावारुपाला आणण्यासाठी कामाला सुरवात केली असल्याचे गडाख यांनी भाषणात सांगितले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!