Thursday, January 20, 2022

सक्तीच्या लसीकरणास एमआयएमचा विरोध

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोना प्रतिबंधक लसीकरण वाढावे, यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे सक्ती करण्यात येऊ लागली आहे. मात्र, याला एमआयएमने हरकत घेतली असून नागरिकांनावर अशी सक्ती करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

या भूमिकेच्या समर्थनार्थ विविध न्यायालयांचे निवाडे आणि राज्य घटनेतील तरतुदींचीही उदाहरणे देण्यात आली आहेत. एमआयएमचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे.

एकीकडे करोनाची रुग्ण संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी लसीकरण वेग घेत नाही. लस उपलब्ध असूनही नागरिक त्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आढावा घेताना संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले जात आहे.

त्यामुळे लसीकरण वाढावे, यासाठी अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात काही निर्णय घेत सक्ती करण्यास सुरवात केली आहे. नगर जिल्ह्यातही हे प्रकार सुरू झाले आहेत. याला एमआयएमने हरकत घेतली आहे.

यासंबंधी डॉ. अशरफी यांनी म्हटले आहे की, लस न घेतलेल्यांना पगार मिळणार नाही, रेशन, पेट्रोल मिळणार नाही, अनेक ठिकाणी प्रवेश मिळणार नाही, अशी सक्ती करण्यात येत आहे. ही नागरिकांची पिळवणूक आहे. वास्तविक

पाहाता लस घेण्यासाठी कोणालाही सक्ती करता येणार नाही, हे अनेक सरकारी यंत्रणा आणि न्यायालयानींही स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार करोना प्रतिबंधक

लस घेणे नागरिकांना अनिवार्य नसून ऐच्छिक असल्याचे स्ष्ट केले आहे. तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ यांनीही करोना चाचण्याही ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच मेघालय, गुजरात, मणिपूर येथील उच्च न्यायालयांनीही लसीकरणासाठी सक्ती करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!