Tuesday, January 18, 2022

उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चालक ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील कारखाना परिसरामध्ये पहाटे साडे तीनच्या सुमारास ट्रॅक्टर जुगाड चालक ट्रॅक्टर खाली करण्यास वेळ असल्याने शेजारील जुगाड जवळ विश्रांतीसाठी झोपी गेला.

जुगाड ट्रॅक्टर मागेपुढे घेताना जुगाड ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील कारखाना परिसरामध्ये जुगाड चालक या व्यक्तीला मयत नानासाहेब दगडू मेचे (वय 40) हे झोपलेले आहेत हे माहीत नव्हते.

चालकाने जुगाड ट्रॅक्टर मागेपुढे घेताना सदर झोपलेल्या नानासाहेबाच्या अंगावरून जुगाड ट्रॅक्टर गेल्याने नानासाहेब मेचे हे जागीच ठार झाले.यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी पंचनामा करून मयत नानासाहेब दगडू मेचे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल याठिकाणी आणण्यात आला. नानासाहेब मेचे यांचे नातेवाईक यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!