Friday, January 21, 2022

14 की 15 जानेवारी? यंदा नेमकी कोणत्या दिवशी साजरी करावी संक्रांत? जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जानेवारी महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणापासून नवीन वर्षातील सण-समारंभांची सुरुवात होते. साधारण 14 किंवा 15 जानेवारी या दिवशी संक्रांत येते. घरातील दिनदर्शिकेवर तशी नोंदही केलेली असते

त्यानुसार देशभर हा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी संक्रांत नेमकी कोणत्या दिवशी साजरी करावी याबाबत लोकांच्या मनात काहीसा गोंधळ आहे. काहीजण यावर्षी संक्रांत 14 जानेवारीला असल्याचं तर काहीजण 15 जानेवारीला असल्याचं सांगत आहेत.

काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 14 जानेवारी (शुक्रवार) रोजी सकाळी 8 वाजून 49 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळं मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 15 जानेवारी (शनिवार) रोजी दुपारी 12 वाजून 49 मिनिटांपर्यंत राहील.

अशा स्थितीमुळं मकरसंक्रांत 15 जानेवारीला साजरी करणं योग्य आहे. स्नान-ध्यान, दानधर्मदेखील 15 जानेवारीलाच करणं शुभ राहील.तर, द्रुक पंचांगानुसार, दिल्लीला केंद्रस्थानी ठेवून पाहिल्यास यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी रोजी

दुपारी 2 वाजून 43 मिनिटांपासून सुरू होत आहे आणि संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी संपत आहे. अशा स्थितीत दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनीच सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे. या स्थितीच्या आधारावर मकरसंक्रात 14 जानेवारीला साजरी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

स्थानावर आधारित पंचांगामुळे पुण्यकाळ वेगळा-वेगळा मिळत आहे. त्यामुळं मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुण्यकाळ वेगळा मिळत असला तरी दोन्ही दिवस योग्य असल्याचं ज्योतिषांचं म्हणणं आहे.

त्यामुळं यावर्षी तुम्ही 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी यापैकी कोणत्याही एका दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा करू शकता. तरीही तुमच्या मनात शंका असेल तर तुमच्या सध्याच्या स्थानानुसार कोणता दिवस जास्त चांगला आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेऊ शकता.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!