Saturday, January 22, 2022

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाच्याने मित्राच्या मदतीने आपल्या मामीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये गँगरेपचा प्रकार घडला. कामाच्या निमित्ताने खोलीत बोलावून दोघांनी हे दुष्कृत्य केलं.

सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी आरोपीने मामीला गुंगीचे औषध पाजले होते. मामीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओही नराधम भाच्याने शूट केल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना 31 डिसेंबरच्या संध्याकाळी ग्वाल्हेरमधील हनुमान नगर गोला मंदिरात घडली होती.

यानंतर भाच्याने मामीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.घटनेच्या दोन दिवसांनी आरोपींनी मामीला पुन्हा आपल्या खोलीत बोलावले. मामीने विरोध केल्यावर त्याने मामाच्या मोबाईलवर तिचा न्यूड व्हिडीओ पाठवला.

व्हिडिओ समोर येताच मामीने मामाच्या मदतीने गोला मंदिर पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

कोणालाही काही सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करून मामाला गोळ्या घालू, अशी धमकी घटनेनंतर दोन्ही आरोपींनी दिली. यानंतर घाबरलेली महिला घरी परतली, मात्र आरोपी भाच्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नऊ जानेवारी

रोजी आरोपीने फोन करून महिलेला घरी येऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.भाच्याच्या या मागणीचा मामीने विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या भाच्याने बलात्काराच्या वेळी मामीचा शूट केलेला न्यूड व्हिडिओ रविवारी मामाच्या मोबाईलवर पाठवला.

मामाने घरी पोहोचताच तिच्याशी वाद घातला. त्यानंतर तिने संपूर्ण घटना सांगितली.यानंतर मामा-मामी दोघांनी गोला मंदिर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!