Saturday, January 22, 2022

गरजू रुग्णांसाठी ५१ हजाराची मदत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देवून मुळा बॅंकेचे माजी अध्यक्ष रेवणनाथ निमसे यांनी गरजू व गरीब रुग्णांच्या औषधोपचार करीता ५१ हजाराची मदत सोनई येथील लिपाने हाॅस्पिटलला दिली.या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

लिपाने हाॅस्पिटल मध्ये झालेल्या कार्यक्रमात निमसे यांच्या वतीने ५१ हजाराचा धनादेश विनायक दरंदले व माजी सरपंच राजेंद्र बोरुडे यांच्या हस्ते डाॅ.संदीप लिपाने यांना देण्यात आला. यावेळी मुळा कारखाना कर्मचारी युनियनचे सेक्रेटरी डी.एम.निमसे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब निमसे, ग्रामपंचायत सदस्य सखाराम राशिनकर,पत्रकार सुनिल दरंदले, डाॅ.वर्पे, रोहिदास कोठवळ उपस्थित होते.हे सेवाभावी कार्य जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेतून केल्याचे रेवणनाथ निमसे यांनी सांगितले.

वडील मिठ्ठू पाटील निमसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही आरोग्य विषयी उपक्रम राबविला होता.जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची शिकवण लक्षात घेवून बन्धू रेवणनाथ निमसे यांचा उपक्रम स्तुत्य आहे.
– डी. एम.निमसे,सेक्रेटरी, मुळा कारखाना कर्मचारी युनियन

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!