Friday, January 21, 2022

महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे रब्बी हंगामातील

पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. अशात राज्यात कोसळणारा पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा मुक्काम वाढला आहे. येत्या तीन दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम

स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना दुसरीकडे थंडीचा कडाका देखील वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे.

त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!