Saturday, January 22, 2022

नगरच्या पालकमंत्रीपदीची जबाबदारी या मंत्र्यांकडे ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नगर जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

यांच्यासह अनेक नावांची चर्चा आहे. मात्र, यात उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर आले आहे.दरम्यान, आज बुधवारी नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाली, तर नगरची उद्या गुरुवारी होणारी नियोजन समितीची बैठक ही

 नूतन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. परंतु, मध्यंत्तरी त्यांनी नगरच्या पालकमंत्री पदाच्या आपल्यावरील जबाबदारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती.

तेव्हापासून नगरला नवीन पालकमंत्री दिला जाणार, अशी चर्चा सुरू होती. यामध्ये नगरचा अनुभव असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यापाठोपाठ नगरमधून मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके आदी नावांचीही चर्चा होती.

मुुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यामध्ये मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे येत आहे. शिवाय, कोणत्याही क्षणी या नावाची घोषणा होऊ शकते, असेही विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!