Friday, December 3, 2021

घरबसल्या मोबाईलवरुन मागवा रेशन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम : कोरोना (Covid19) काळात नागरिकांचं बाहेर पडणं सुरक्षित राहीलं नाहीय. पण रेशन (Ration Card) घेण्यासाठी लोकांना दुकानापर्यंत जाव लागतं. हे देखील एकप्रकार धोका पत्करण्यासारखं आहे.

पण आता एपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन ऑर्डर देऊ शकणार आहात. सरकारने Mera Ration app नावाचे मोबाइल अ‍ॅप आणले आहे.

हे मोबाइल एप सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या एक भाग आहे. या अ‍ॅपच्या डाउनलोड करण्यापासून रेशन ऑर्डरपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

सर्वप्रथम आपण आपल्या मोबाइलमध्ये Google Play Store वर जा. तिथे सर्च बॉक्समध्ये Mera Ration app शोधा.मेरा रेशन अपमध्ये नोंदणी – अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात तुमचा रेशनकार्ड नंबर नोंदवावा लागेल. यासाठी प्रथम अ‍ॅप उघडा.

आपल्याला नोंदणीचा ​​पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यामध्ये आपला रेशन कार्ड नंबर टाकून सबमिट बटण दाबा.या मोबाईल अ‍ॅपचा फायदा नोकरीसाठी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाणार्‍या बर्‍याच लोकांना होणार आहे.

इतर शहरांमध्ये त्यांना रेशन दुकानांविषयी माहिती नसते, या अ‍ॅपमध्ये जवळच्या दुकानांबाबतही संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.

रेशन कधी आणि किती येईल याबद्दल आपल्याला यातून संपूर्ण माहिती मिळेल. तसेच तुम्हाला किती रेशन मिळते ?, ही माहिती या अ‍ॅपद्वारे उपलब्ध होईल. या अॅपद्वारे आपल्या मागील व्यवहाराचा तपशील देखील आपल्याला ठाऊक होईल.

हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, लवकरच ते अन्य 14 भाषांमध्येही उपलब्ध होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या अ‍ॅपच्या माध्यातून दुकानातून रेशन कधी आणि कोणत्या दुकानातून घेण्यात आले ? याचीही माहिती मिळणार आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!