Friday, January 21, 2022

दहावी बारावी परीक्षा बाबत मोठी बातमी….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी (२०२२) दहावी आणि बारावीच्या परीक्षा परंपरागत पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होतील; असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. कोरोना

संकटामुळे राज्यातील शाळा-कॉलेज १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र परीक्षा परंपरागत ऑफलाइन पद्धतीने आणि वेळापत्रकानुसारच होईल; असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. परिस्थिती पाहून काही बदल

आवश्यक वाटल्यास केले जातील पण सध्या तरी असा कोणताही बदल करण्याबाबत निर्णय झाला नसल्याचे मंडळाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. याआधी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी २०२१ मध्ये परीक्षा रद्द करुन मूल्यांकन करुन निकाल जाहीर करण्यात आला होता.

नंतर २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष १५ जून २०२१ पासून सुरू झाले. जिथे कोरोना संकटाची तीव्रता जास्त होती तिथे ऑनलाइन आणि इतरत्र ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होते. पण आता राज्यातील कोरोना रुग्ण वाढल्यामुळे शाळा-कॉलेज

१५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाला असला तरी दहावी आणि बारावीच्या २०२२ मध्ये होणार असलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार परंपरागत ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

जाहीर वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १५ मार्च आणि बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. नववीतून २०२१च्या मूल्यांकनानंतर दहावीत गेलेल्यांची संख्या

युडायस नोंदणीप्रमाणे १८ लाख ९५ हजार ३९८ होती. यातील इतर मंडळांचे सुमारे ९५ हजार विद्यार्थी वजा केले तरी १८ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी दहावीच्या परीक्षेसाठी व्हायला हवी. पण १६ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनीच दहावीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केली आहे.

परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत नोंदणीची परवानगी असल्यामुळे आणखी काही जण नोंदणी करतील असा अंदाज आहे. पण जे नोंदणी करणार नाहीत त्यांचे काय झाले ते शिक्षणापासून वंचित राहिल आहेत का याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. बारावीसाठी आतापर्यंत १४ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!