Saturday, January 22, 2022

मोठं विधान: 26 जानेवारीला जर मी नगरचा पालकमंत्री राहिलो तर झेंडा वंदनला येईल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना त्यांचे जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.

मात्र मुश्रीफांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्याचे विधान केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अहमदनगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री

पदावरून मला मुक्त करावं अशी इच्छा मी 5 व्यक्त महिन्यांपूर्वी केली होती, मात्र अजूनही मला मुक्त केलं नाही असे वक्तव्य त्यांनी केलं.पालकमंत्रिपदावरून मुक्त होईल त्यावेळी देखील नगरवर माझं तितकंच प्रेम राहील असेही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

जोपर्यंत आहे, तसेच तोपर्यंत प्रामाणिक काम करून तुमची सेवा करत राहील अस त्यांनी म्हटलंय. तर 26 जानेवारीला जर मी पालकमंत्री राहिलो तर झेंडा वंदनला येईल अस मुश्रीफ यांनी सांगितलय. त्यामुळे लवकरच नगरचे पालकमंत्री बदलण्याची संकेत मिळतायत.

तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच नाव सध्या चर्चेत आहे.मश्रीफांनी जरी पदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेतंय? ही जबाबदारी दुसऱ्या कुणाला देणार? की त्यांच्याकडेच

ठेवणार? याकडेही नगरकरांचे लक्ष लागले आहे. जर पालकमंत्री बदलले तर हे पद नगरमधील कुठल्या नेत्याकडे जाणार की पुन्हा जिल्ह्याच्या बाहेरच्या नेत्याकडे हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!