नेवासा
नेवासा तालुक्यातील गोडेगांव जनकल्याण फौंडेशनचे सन २०२३ चे संत तुकडोजी महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यात पत्रकार-जलमित्र सुखदेव फुलारी यांचेसह समाजिक कार्यकर्ते राऊसाहेब मगर,सुभाष सोनवणे,भगवान मरकड,पत्रकार राजेंद्र देसाई यांचा समावेश
असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली.
जनकल्याण फौंडेशनचे संत तुकडोजी महाराज पुरस्काराचे वितरण गोंडेगाव येथे रविवार दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील गोसावी यांचे हस्ते,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांचे अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली.
*समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ति…*
*समाजभुषण पुरस्कार:- श्री. सुखदेव एकनाथ फुलारी,भेंडा (पत्रकारिता, मृद व जल संधारण, वृक्ष संवर्धन कार्यातील भरीव कामगिरी).
*सामाजिक पुरस्कार:-श्री.रावसाहेब मगर (शरणपुर वृद्धाश्रम,नेवासा).
*साहित्य पुरस्कार:- श्री. सुभाष का. सोनवणे (निवृत्त पोलीस अधिकारी,अहमदनगर)
*आरोग्य पुरस्कार:- सौ.रोहीणी चंद्रकांत जाधव (आरोग्य उपकेंद्र चिलेखनवाडी)
*कृषिभुषण पुरस्कार:- श्री. भगवान सुर्यभान मरकड (मढी, ता. पाथर्डी)
*पत्रकारीता पुरस्कार:- श्री.राजेंद्र बाबुराव देसाई (मु. पो. वडाळा महादेव,ता.श्रीरामपुर)
*विशेष पुरस्कार:-*
शिवशाहीर अक्षय डांगरे,वरूर (कलावंत), सौ.अनिता अशोक कानडे,पाथर्डी(आदर्श शिक्षिका),श्री.अनिल शाहु सरोदे,कुकाणा(ग्रंथपाल)
*गुणवंत सत्कार मुर्ती:-*
श्री.अमोल अशोक धुमाळ,भेंडा (राज्य कर निरीक्षक), श्री. राहुल शिवाजी शेरकर,बेलपिंपळगांव (राज्य कर निरीक्षक), कु.ऐश्वर्या दिपक नवले,भेंडा (भु-कर मापक).