Saturday, January 22, 2022

पीएम किसानची:ही सेवा झाली बंद, कोट्यवधी लाभार्थ्यांवर होणार परिणाम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ चालवली जाते. जर तुम्हीदेखील या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. या योजनेत समाविष्ट असलेली एक महत्त्वाची सुविधा सरकारनं आता बंद केली आहे.  ही सुविधा बंद झाल्यामुळे कोट्यवधी लाभार्थ्यांना आपलं स्टेटस तपासता येणार नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेशी निगडित असलेल्या शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांची माहिती सुरक्षित राहील मात्र, त्यासोबतच त्यांना काही अडचणींचा देखील सामना करावा लागणार आहे. आतापर्यंत, पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेतकरी आपलं स्टेटस तपासू शकत होते. पीएम किसान पोर्टल भेट देऊन, कोणताही शेतकरी आपला आधार क्रमांक , मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक वापरून अॅप्लिकेशनची सद्यस्थिती काय आहे, आपल्या  बँक खात्यात किती हप्ता जमा झाला आहे, अशा गोष्टींची माहिती मिळवू शकत होता. आता मात्र, या सुविधेमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकरी पीएम किसान पोर्टलवर मोबाईल क्रमांक वापरू शकणार नाहीत. येथून पुढे अॅप्लिकेशन स्टेटस जाणून घेण्यासाठी आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकच वापरता येणार आहे.

मोबाईल क्रमांक वापरून स्टेटस तपासणं खूप सहज आणि सोप होतं, यात शंका नाही. मात्र, या सुविधेचे अनेक तोटेदेखील होते. अनेक लोक इतर कोणाचाही मोबाईल नंबर टाकून स्टेटस तपासायचे. मोबाईल क्रमांक ही सहज उपलब्ध होणारी गोष्ट असल्यानं इतर कुणीही शेतकर्‍यांची माहिती मिळावत असे. त्यामुळे आता मोबाईल क्रमांक वापरण्याची सुविधा बंद केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!