Monday, January 17, 2022

नगर जिल्हा ज्या खूनाने हादरला :त्या खुनाचा तब्बल 11 महिन्यांनंतर गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील मिल्लतगर भागात राहणार्‍या तरुणाचा फेब्रुवारी 2021 या महिन्यात शहरातील मिल्लतनगर, वॉर्ड नं. 1 या परिसरात राहणारा जुनैद जाकीर पटेल या तरुणास मागील भांडणाच्या कारणावरून मनात  राग धरून जाफराबाद येथील सलीम उर्फ सलमान मुनीर शेख, (वय 27), अख्तर मुनीर शेख (वय 52) या दोघांनी जुनैद यास बेदम मारहाण करून पाण्यात बुडवून त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जुनैदचा मोबाईल काढून घेतला. याप्रकरणी जुनैदचे वडील जाकीर हुसेन पटेल (वय 70) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 (3) अन्वये चौकशी अर्ज क्र. 252/2022 प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.  त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 34/2021 प्रमाणे भादंवि कलम 302, 201, 34 अन्वये काल गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे करत आहेत.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!