Monday, January 17, 2022

मोठी बातमी! अजित पवार यांच्या नावाने धमकी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने पुण्यातील एका बड्या बिल्डरला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचं प्रकरण उघड झालं आहे. अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन या बिल्डलकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.

अॅपच्या सहाय्याने आरोपींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने बिल्डरला फोन केला. अजित पवार यांचा पीए चौबे बोलत असल्याचं सांगून आरोपींनी या बिल्डरकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी बिल्डरने तात्काळ पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हा प्रकार १३ जानेवरीपर्यंत सुरु होता. आरोपींनी बिल्डरकडून २ लाख रुपयेही उकळले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास करत ६ आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे एका अॅपद्वारे आरोपींनी खुद्द अजित पवार यांच्याच मोबाईल क्रमांकाचा वापर केला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!